टिटवाळ्यातील जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक कटट्याला जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन
जिव्हाळा जेष्ट नागरिक संघ टिटवाळा यांच्या वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. टिटवाळा परिसरात जेष्ठ नागरिक संघाला जागा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी जिव्हाळा मित्र मंडळ जेष्ट नागरिक कट्टा सेवाभावी संस्थेचे घनश्याम कटारे, विजय भोईर,सुरेश जाधव,के एल उघडे, पालकर बनसोडे, शिवाजी भालेराव उपस्थित होते.
यावेळी विजय भोईर यांनी सांगितले की जिव्हाळा मित्र मंडळ ज्येष्ठ कट्टा सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने दोन वर्षापासून जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. महापालिका प्रशासनाने दखल घेऊन जागा उपलब्ध करून दयावी असे भोईर यांनी सांगितले.