• Total Visitor ( 133743 )

कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतक-याकडून तोडून गेलेल्या ऊसाच्या पाचटाची कुटी

Raju tapal January 15, 2025 90

कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतक-याकडून तोडून गेलेल्या ऊसाच्या पाचटाची कुटी
   

शिरूर:- जमिनीची सुपीकता वाढत असल्याने शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतक-याने त्यांच्या शेतात तोडून गेलेल्या ऊसानंतर पाचटाची कुटी तयार करून घेतली आहे.
याबाबत शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी सांगितले, ऊसाची तोडणी झाल्यानंतर बहुसंख्य शेतकरी ऊसाचे पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्यानंतर सेंद्रिय पदार्थ जळून नष्ट होतात.परिणामी सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी होते.जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर ढासळत जातो. पाचटकुटी करून पाचट‌ कुजविल्यामुळे जमिनीत सेंद्रिय घटकांच प्रमाण वाढतं. जमिनीची सुपीकता टिकून राहते.अन्नद्रव्य व्यवस्थापन खर्चात बचत होते.पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून ओलावा जास्त वाढण्यास मदत होते.पाचट कुजविल्यास ६ ते ७ टन सेंद्रिय खत मिळते.जमिनीची सुपिकता सातत्याने वाढत जाते. पाचट‌ तंत्रज्ञानामुळे जमिनीची सुपीकता ३ ते ४ वर्षे टिकून राहाते‌.खोडव्याचे पीकही सातत्याने घेता येते. यामुळे बेणे,मशागत,मजुरी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते.पाचटकुटी शेतात ठेवल्यामुळे पाल्यातील मुख्य अन्नद्रव्ये नत्र ,स्फुरद,पोटॅश कॅल्शियम, मॅग्नेशियम गंधक,जस्त ही दुय्यम अन्नद्रव्ये लोह,मंगल,तांबे,जस्त ही सुक्ष्म अन्नद्रव्ये पाचटाचे विघटन होताना ऊस पिकास उपलब्ध होत जातात. उत्पादन वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो.जमिनीचा ओलावा टिकून राहतो.जीवाणू आणि गांडूळाची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. जमीन भुसभुशीत होवून उत्पादनात भरीव वाढ होते.हवा खेळती राहाते अशी माहिती ऐकण्यात  तसेच वाचनात आल्याने मी माझ्या शेतातील १ एकर ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाच्या पाचटाची कुटी तयार करून घेतल्याचे शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी "टिटवाळा न्यूज"ला सांगितले.
ज्या शेतक-यांना शेतातील ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाच्या पाचटाची‌ कुटी तयार  करून घ्यावयाची आहे त्या ऊस उत्पादक शेतक-यांनी रविंद्र पवार मोबाईल नंबर ८९७५६८८१४७ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांनी केले आहे.
        

Share This

titwala-news

Advertisement