शिवसेनेच्या वतीने आयोजित आधार कार्ड शिबीर संपन्न
कल्याण:- शिवसेना,युवासेना प्रभाग क्रमांक 38 रामबाग तसेच माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विणाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रामबाग परिसरातील नागरिकांसाठी आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
आधार कार्ड हा महत्वाचा पुरावा असुन तसेच शासकीय कामासाठी आधार कार्ड लागतेच, आधार कार्ड काढण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात या सर्व बाबींचा विचार करून माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी परिसरातील नागरिकांसाठी आधार कार्ड अपडेट तसेच नवीन आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील असंख्य नागरिकांनी सदरील शिबीराचा लाभ घेतला.
जेष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर टिवटे यांनी सांगितले की,प्रत्येक शासकीय कार्यालयात आधार कार्डची आवश्यकता असते तसेच आधार कार्ड अपडेट करणे हे आवश्यक आहे त्यामुळे नागरिकांची अडचणी लक्षात घेऊन रामबाग परिसरातील नागरिकांसाठी तसेच शालेय व कॉलेज विध्यार्थी यांच्या साठी दोन दिवस आधार कार्ड शिबीर माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विणाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता असे सांगितले.
यावेळी विभाग प्रमुख संजोग गायकवाड, शाखा प्रमुख अभय कामल्य,उपविभाग प्रमुख नरेंद्र नागरे,वेणु शेट्टी तसेच शिवसेना महिला आघाडीच्या उज्वला कामल्य,सविता तांबे,मीना बोपटे,शोभा बोंडे,प्रिया खापरे, वैशाली चौधरी, तसेच युवा सेना उपशहर अधिकारी श्रेयस जाधव उपशहर संघटक महेश भमोडे,सोहम सावंत,हर्ष तरडे,यश गावडे,अक्षय बडवणे,अक्षय भोईर, देवेंद्र घरदाळे,योगेश कुलकर्णी ओकांर बोन्डे,राकेश तिवारी, कल्पेश यादव,दिपक शिंदे,दिपक दुसाने, संजय दिवटे, दिपक तांबे,अभिषेक गवारे,शिवसैनिक बापु चौधरी, मुकंद मजुमदार,समिर सावंत यांच्या सह शिवसेना व युवासेना व महिला आघाडी ,जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.