जगेन तर देशासाठी,मरेन तर देशासाठी हा महामंत्र अनेक क्रांतीयोद्ध्यांना देणारे सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पुणे येथील भवानी पेठेतील लहुजी क्रिडा संकुल पुतळ्यासमोर दिपोत्सव साजरा करून अभिवादन करण्यात आले.
क्रांतीकारक केशवराव जेधे यांचे वंशज कनोजी जेधे, लोकमान्य टिळक यांचे वंशज रोहित टिळक यांच्या हस्ते उपस्थितीत दिपोत्सव साजरा करण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे पुणे शहर अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहनदादा जोशी, यादवराव सोनावणे कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ,नगरसेवक अविनाश बागवे यांनी शाल, श्रीफळ देवून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या दिपोत्सव कार्याक्रमासाठी संजय साठे, सुरेखा खंडाळे, दयानंद अडागळे, सुनील बावकर, हुसेन शेख, रोहित अवचिते, मारूती कसबे यांनी उपस्थित राहून विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विठ्ठल थोरात यांनी केले. अरूण गायकवाड यांनी आभार मानले.