आई वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सावत्र मुलाची बापाकडून हत्या ; बारामती तालुक्यातील पारवडी येथील घटना
आई वडिलांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सावत्र मुलाची बापाने हत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील शिपकुले वस्तीवर घडली.
गोपीनाथ मारूती जाधव वय -१८ वर्षे असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असून मारूती जाधव असे आरोपी बापाचे नाव आहे.
आई वडिलांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असलेल्या मुलाची कातकरी म्हणून काम करणा-या वडिलांनीच लाकडे तोडण्यासाठी लागणा-या कोयत्याने मानेवर वार करून हत्या केली.
कोयत्याचा घाव जोरात बसल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी मारूती जाधव याच्यावर बारामती तालुका पोलीसांनी भा.द.वि.कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक महेश ढवाण पुढील तपास करत आहेत.