• Total Visitor ( 84750 )

आंबिवलीतील इराणी वस्तीतील सराईत गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या कल्याण पश्चिमेतील आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत देशभरातील 20 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात पाच वर्षांपासून फरार असलेला तसेच मोक्का अंतर्गत अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी हसनैन सय्यद याला पो

Raju Tapal January 20, 2022 39

आंबिवलीतील इराणी वस्तीतील सराईत गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

कल्याण पश्चिमेतील आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत देशभरातील 20 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात पाच वर्षांपासून फरार असलेला तसेच मोक्का अंतर्गत अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी हसनैन सय्यद याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे.  आंबिवली परिसरातील इराणी वस्ती म्हणजे चोरटय़ांचा अड्डा आहे. देशभरातील अनेक गुन्ह्यातील आरोपी या वस्तीत राहतात. अनेकदा पोलिसांनी या वस्तीत छापा टाकून कोंबिंग ऑपरेशन केले आहे. 
 डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनिल तारमळे यांच्या पथकाला हसनैन सय्यद हा पाच वर्षापासून फरार असलेला आरोपी या वस्तीत वास्तव्य करुन असल्याची माहिती मिळाली. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी जे.डी. मोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीस पकडण्यासाठी सापळा रचला. तसेच ठरलेल्या नियोजना प्रमाणे पोलिसांनी येथे छापा टाकला. तसेच हसनैन याला बेड्या ठोकल्या. 

छाप्या दरम्यान हसनैन हा पोलिसांच्या ताब्यात सापडला. मात्र इराणी वस्तीतील महिलांनी पोलिसांवर हल्ला केला. यावेळी पोलिसांसोबत झटापटी झाली. पोलिसांनी हसनैन सय्यदला पोलिसांच्या गाडीत टाकले. त्याला घेऊन थेट मानपाडा पोलीस स्टेशन गाठले. हसनैन सय्यद हा देशात चैन स्नॅचिंगचा मोठा गुन्हेगार मानला जातो. 20 गुन्ह्यात तो फरार होता. त्याच्या विरोधात मोकाही लावण्यात आला आहे. पाच वर्षानंतर हसनैनला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा काही माल हस्तगत केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Share This

titwala-news

Advertisement