आयशर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू
आयशर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील सूर्यगड गावाजवळ घडली. या अपघातात १४ वर्षाच्या मुलासह काका पुतण्याचा मृत्यू झाला.
गणेश डंबाळे वय - २४, सोमनाथ पवार वय - ४२, अश्विन पवार वय - १४ अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
सुरगाण्याकडून उंबरठाणकडे आयशर टेम्पो क्रमांक एम एच १५ एफ व्ही ०२४१ जात होता. या टेम्पोने सूर्यगड गावाजवळील उतारावर उंबरठाणकडून येणा-या एम एच १५ बी एस ६६७५ या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण ठार झाले. दुचाकीचे चाक निखळून पडले. दुचाकी टेम्पोसोबत फरफटत जावून चिखलात रूतली. टेम्पोचालक फरार झाला असून पोलीस टेम्पोचालकाचा शोध घेत आहेत.