आयुष्याला आकार देण्यात महत्वाचे योगदान गुरूंचे असते ; प्रसिद्ध उद्योगपती, शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांचे मत
जीवनात गुरुंना खूप महत्व आहे. आयुष्याला आकार देण्यात महत्वाचे योगदान गुरुचे असते असे मत प्रसिध्द उद्योगपती व नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी शिरूर येथे व्यक्त केले
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक प्रा .विलास बापूराव आंबेकर यांचा मानपत्र देवून नूकताच सन्मान करण्यात आला यावेळी प्रसिद्ध उद्योगपती , शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल बोलत होते.
आमदार ॲड अशोक पवार ,आमदार निलेश लंके , नगराध्यक्षा वैशाली वाखारे , राज्य प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम , प्राचार्य डॉ.के सी मोहिते, अर्चना बहेनजी ,पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार , माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण ,शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार ,नामदेवराव घावटे ,माजी नगराध्यक्षा उज्वला बरमेचा ,राजेंद्र क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते .
यावेळी बोलताना धारिवाल म्हणाले की शिक्षणा शिवाय पर्याय नाही. शिक्षणातून परिवर्तन होते . आंबेकर परिवार परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असल्याचे ते यावेळी म्हणाले .
आमदार ॲड. अशोक पवार यावेळी बोलताना म्हणाले की, सामाजिक कार्यात आंबेकर परिवाराचे योगदान मोठे आहे .आपण ज्या पदावर कार्यरत आहोत त्याद्वारे समाजाचे हित जोपासणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
प्रा.विलास आंबेकर यांनी शहराच्या परिसराच्या विकासासाठी कार्यरत राहावे. परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या-या विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले .
यावेळी आमदार निलेश लंके ,माजी प्राचार्य नंदकुमार निकम ,प्राचार्य डॉ. के .सी . मोहिते , जाकिरखान पठाण , नामदेवराव घावटे आदीनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. विलास आंबेकर यांचा पगडी, शाल ,पुस्तक देवून सपत्नीक सन्मान करुन मानपत्र प्रदान करण्यात आले .
प्रा .विलास आंबेकर यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षणक्षेत्रात काम करताना अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याची संधी मिळाल्याबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करुन आगामी काळात विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या सर्वागीण विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले .
मानपत्राचे वाचन अर्चना बहेनजी यांनी केले . प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले .स्वागत शिरुर शहर कॉग्रेस आय चे अध्यक्ष ॲड. किरण आंबेकर यांनी केले . सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी तर आभार धीरज आंबेकर यांनी मानले .