गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या लोकप्रिय नाटकांमध्ये तसेच घनचक्कर ,सत्वपरिक्षा, ,डोक्याला ताप नाही या काही मराठी चित्रपटांबरोबरच मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्री माधवी गोगटे यांचे सेव्हन हिल्स रूग्णालयात कोरोनाने निधन झाले.
त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे पती आणि विवाहीत कन्या आहे.
जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर घनचक्कर या चित्रपटात माधवी गोगटे यांनी प्रमुख भुमिका साकारली होती.
गेला माधव कुणीकडे हे त्यांनी अभिनेता प्रशांत दामलेंबरोबर केलेले नाटक खूप गाजले होते. मराठी रंगभुमीबरोबरच मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले.
गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या गाजलेल्या नाटकांबरोबरच अंदाज आपला आपला अशा काही नाटकांमध्ये त्यांनी काम केले. राजा बेटा, सपने सुहाने लडकपन के, कोई अपना सा ,ऐसा कभी सोचा न था, एक सफर, बसेरा, कही तो होगा अशा काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटविली.
स्टार प्रवाहावरील स्वप्नांच्या पलिकडे, झी युवा वाहिनीवरील तुझं माझं जमतयं या मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी रंगभुमीबरोबरच मराठी व हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. दंगल टिव्हीवर त्यांची सिंदूर की किमत ही मालिका सुरू होती. स्टार प्लस वरील अनुपमा या मालिकेशी त्या जोडल्या होत्या. या मालिकेत अनुपमाच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती.