मालवाहू कंटेनर - कारची समोरासमोर धडक; तिघा़ंचा मृत्यू,एक महिला जखमी
न्हावरे-शिक्रापूर रस्त्यावरील साठे वस्तीजवळ अपघात
शिरूर :- न्हावरे-शिक्रापूर रस्त्यावरील साठे वस्तीजवळ रविवारी ( दि.२३ मार्च ) रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान मालवाहू कंटेनर व कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
मृतांमध्ये बाप लेकीचा व मामाचा समावेश असून संबंधित अपघात कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचे समजते.
अपघाताच्या घटनेनंतर कारचालक पळून गेला असून न्हावरे पोलीस अपघाताच्या या घटनेचा तपास करत आहेत.
मृतांना न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी महिलेला खाजगी हाॅस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असेही समजते.
प्रतिनिधी :- पत्रकार विजय ढमढेरे कोंढापुरी,शिरूर