टिटवाळ्यातील मोरया नगर मधील अनधिकृत चाळींच्या बांधकामांवर कारवाई
14 खोल्या 17 जोते व 17 नळ कनेक्शन खंडित
टिटवाळा ( राजू टपाल ) :- केडीएमसीच्या अ प्रभागाने प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई ही सुरूच ठेवली असून
आज देखील टिटवाळा पूर्व मोरया नगर परिसरातील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. कारवाई मध्ये १४ पूर्ण अवस्थेत असलेल्या खोलीचे वीट बांधकाम, १७ दगडी जोत्यांचे (फाउंडेशन), सिमेंट काँक्रीटचे फाउंडेशन तोडण्यात आलेले आहेत तसेच १७ पाण्याचे कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत
अजूनही प्रभागातील चालू बांधकामांचा शोध घेऊन नियमितपणे निष्कासनाची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.
कारवाई साठी अतिक्रमण विभागाचे ५ पोलीस कर्मचारी, ठेकेदाराचे ५ कामगार एक जेसीबी. अतिक्रमण विभाग अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक आणि पथकातील आठ कामगार यांचे सहाय्याने निष्कासन केले आहे. अशी माहिती प्रमोद पाटील
सहाय्यक आयुक्त १/अ प्रभाग यांनी टिटवाळा न्यूजला दिली.