अज्ञात वाहनाच्या धडकेत चोभानिमगाव येथील युवकाचा मृत्यू
कडा येथील काम आटोपून चोभानिमगाव गावाकडे दुचाकीवरून परतणा-या युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला.
विकास दिपक शिंदे वय - २३ असे मृत युवकाचे नाव असून हा अपघात मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला.
आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील विकास शिंदे हा कामानिमित्त एम एच १७ एस ५४०८ या क्रमांकाच्या दुचाकीवरून कडा येथे आला होता.
काम संपल्यानंतर विकास रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घराकडे परत निघाला. पैठण - बारामती रोडवरील चोभानिमगाव परिसरात विकास आला असता विकास याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विकास शिंदे या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.