• Total Visitor ( 84627 )

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पतीपत्नीचा मृत्यू

Raju Tapal November 29, 2021 37

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पतीपत्नीचा मृत्यू ; मंचर - घोडेगाव रस्त्यावरील वडगाव काशिंबेग फाट्यानजिकची घटना

 

मंचर घोडेगाव रस्त्यावरील वडगाव काशिंबेग फाट्यानजिक भीमाशंकर हॉस्पिटल समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पतीपत्नीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दि.२८/११/२०२१ रोजी दुपारी घडली.

सावता दत्तात्रय नाईक वय - ३० रा.नारोडी ता.आंबेगाव यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

फिर्यादी सावता दत्तात्रय नाईक यांचे चुलतभाऊ एकनाथ बबनराव नाईक वय -४७ व भावजय संगिता एकनाथ नाईक लय -४२ रा.नारोडी ता.आंबेगाव एम एच १४ डी क्यू   ५६०४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून नारोडी गावाकडे येत असताना त्यांना भीमाशंकर हॉस्पिटल समोर अज्ञात वाहनाने पाठीमागून येवून जोरदार धडक दिली. 

या अपघातात नाईक पतीपत्नीच्या पोटावरून  वाहनाचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. 

स्थानिक नागरिकांनी त्यांना मंचर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. एकनाथ नाईक उपचारापूर्वीच मृत झाले. संगिता नाईक यांच्यावर उपचार सुरू असताना त्या मृत झाल्या. 

एकनाथ नाईक हे चाकण येथील महिंद्रा कंपनीत कामाला होते. रविवारची सुट्टी असल्याने ते त्यांच्या गावी पत्नीबरोबर  जात असताना हा अपघात झाल्याचे समजते.

दुस-या अपघातातील घटनेत आनेवाडी टोलनाक्यानजिक कंटेनर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली.

विद्या मधूकर पटवर्धन वय - ६२ रा. मिरज जि.सांगली असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून क़टेनरने दुचाकीला फरफटत नेल्याने या महिलेच्या शरीराचा चेंदामेंदा झाला.

आनेवाडी टोलनाक्याच्या पुढील बाजूस साता-याहून पुण्याच्या दिशेने कंटेनर क्रमांक एन एल 01 क्यू 6794 हा दोन नंबरच्या लेनमधून जात होता. तर तीन नंबरच्या लेनमधून मधुकर गोविंद पटवर्धन वय - ७२ व त्यांच्या पत्नी विद्या मधुकर पटवर्धन वय - ६२ रा.मिरज जि.सांगली हे दाम्पत्य दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघाले होते. पुलानजिक तीन लेनचे दोन लेनमध्ये विस्तारीकरण असल्याने त्याठिकाणी हा अपघात झाला. 

या अपघातात विद्या पटवर्धन कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या. तर त्यांचे पती मधूकर पटवर्धन गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. 

मधुकर पटवर्धन यांना सातारा येथील सिव्हील रूग्णालयात दाखल केले .

कंटेनरचालक अंकुर पटेल मानखूर्द मुंबई याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दत्तात्रय धायगुडे या अपघाताचा तपास करत आहेत. 

Share This

titwala-news

Advertisement