अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शिक्रापूर येथील ग्रामीण रूग्णालयातील कर्मचा-याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे - नगर महामार्गावर शिक्रापूर येथे आज सकाळी घडली.
गोविंद बबन शिर्के वय -४६ रा.शिक्रापूर ता.शिरूर असे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झालेल्या ग्रामीण रूग्णालयातील कर्मचा-याचे नाव आहे.
शिक्रापूर ग्रामीण रूग्णालयाचे कर्मचारी गोविंद शिर्के हे आज गुरूवार दि.१८ /११/२०२१ रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच १२ यु व्ही ९३९५ मध्ये शिक्रापूर येथील पुणे नगर महामार्गाच्या कडेला असलेल्या रिलायन्स पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरून पुणे - नगर महामार्ग ओलांडत असताना अचानक पुण्याहून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दिल्याने हा अपघात झाला.
सुयश गोविंद शिर्के रा.शिक्रापूर या १९ वर्षीय मुलाने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीसांनी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.