दि युनायटेड स्पोर्ट्स क्लब, चेंदणी कोळीवाडा, ठाणे पूर्व ४००६०३,शिशु विकास मंदिर शाळा संस्थेचे दिवंगत सभासद, शाळेचे माजी विद्यार्थी व अग्निशमन दल, ठा.म.पा. चे कर्मचारी जे दि.१८/१०/२००९ रोजी तारांगण सोसायटी, वर्तकनगर ठाणे प. येथील दुर्घटनेत नागरिकांचे आगीपासून बचाव करीत असताना विरमरण प्राप्त झालेले, शहीद स्वर्गवासी अवधूत सदाशिव ठाणेकर ह्यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त अग्निशमन दलाचे संकटकालीन बचाव प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.याप्रसंगी शालेय विध्यार्थी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.