महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अहिल्यानगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक!
कर्जत :- ६६ वी महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक अहिल्यानगर जिल्ह्याने पटकावले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत येथे महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ५७ किलो वजनी गटामध्ये गादी विभागात अहिल्यानगर जिल्ह्याने पहिले सुवर्णपदक पटकावले. कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील सचिन मुरकुटे याने मुंबई शहरचा सचिन चौगुले यास एक चाकी डाव टाकत चिटपट केले. आणि पहिले सुवर्णपदक पटकावले. यावेळी उपस्थित हजारो प्रेक्षकांनी जल्लोष केला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आमदार रोहित पवार मित्रपरिवार व अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गादी आणि माती विभागातील तसेच महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील कुस्त्यांना प्रारंभ झाला. ५७ किलो वजनी गटामध्ये अंतिम फेरीमध्ये अहिल्यानगरचा सचिन मुरकुटे यांनी मुंबईचा सचिन चौगुले यांचा पराभव केला.
६५ किलो गादी विभाग
उपांत्य फेरी हर्षवर्धन भुजबळकर विजयी झाला त्याने प्रितेश भगत कल्याण याचा पराभव केला. तर दुसरा उपांत्य सामना छत्रपती संभाजी नगर येथील करण बागडे विरुद्ध सातारचा विशाल सुळ यांच्यामध्ये झाला. यामध्ये विशाल सुळ विजयी झाला असून अंतिम लढत विशाल सुळ सातारा व हर्षवर्धन भुजबळकर मुंबई उपनगर हे अंतिम फेरीमध्ये पोहोचले आहेत.
७४ किलो गादी विभाग
आकाश दुबे पुणे शहर याने सांगलीचा योगेश मोहिते याचा उपांत्य फेरीमध्ये पराभव केला. आकाश दुबे हा अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे. दुसरी उपांत्य लढत कोल्हापूरचा सचिन बाबर विरुद्ध पुणे जिल्ह्याचा केतन खारे यांच्यामध्ये होऊन यामध्ये पुणे जिल्ह्याचा केतन खारे विजय झाला आहे. केतन खारे हा देखील अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे.
५७ किलो माती विभाग उपांत्य फेरी
सांगलीचा स्वप्निल पवार विरुद्ध यश बुदखुडे पुणे यामध्ये यश बुदगुडे विजयी
विशाल सुरवसे सोलापूर जिल्हा विरुद्ध अजिंक्य उंद्रे मानकर कोल्हापूर यामध्ये अजित कुंद्रे मानकर विजयी.
यश बुदगुडे पुणे व अजित कुंद्रे मानकर अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
६५ किलो माती विभाग उपांत्य फेरी
अनिकेत शिंदे सोलापूर जिल्हा विरुद्ध सुरज कोकाटे पुणे जिल्हा सुरज कोकाटे विजय
इमरान सय्यद जालना विरुद्ध तेजस पाटील सांगली तेजस पाटील विजय
७४ किलो माती विभाग उपांत्य फेरी
प्रकाश कारले अहिल्यानगर विरुद्ध श्रीकांत दंडे पुणे शहर यामध्ये श्रीकांत दंडे विजयी
संकेत हजारे बुलढाणा विरुद्ध सागर वाघमोडे पुणे जिल्हा यामध्ये सागर वाघमोडे विजयी