• Total Visitor ( 449538 )
News photo

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्याण मध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण

Raju tapal February 02, 2026 117

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्याण मध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण



महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे नुकतेच विमान अपघातात निधन झाले.  त्यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला. एक अभ्यासू लोकनेता गमावला. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकुल वातावरण पसरलेले आहे.

राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ(आप्पा) शिंदे यांच्या आयोजना खाली सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना श्रध्दांजलीतुन उजाळा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे,राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, दैनिक जनमतचे संपादक तुषार राजे, प्रजाराजचे संपादक विष्णुकूमार चौधरी,डॉ गिरीश लटके,नगरसेवक वरूण पाटील,माया कांबळे,माजी नगरसेवक संजय पाटील, प्रकाश तरे,उबाठा गटाचे शहराध्यक्ष बाळा परब,रुपेश भोईर,आम आदमी पक्षाचे शैलेश जोगदंड,मराठा ज्ञाती समाजाचे योगेश देशमुख,जेष्ठ पत्रकार किरण सोनवणे, उत्तम रोकडे,रमेश साळवे, रमेश बर्वे,प्रशांत माळी,राणी कपोते,नितीन सकपाळ,स्वप्नील ताकावणे,पारसनाथ तिवारी,राष्ट्रवादी शरद गटाचे शहराध्यक्ष स्वप्नील रोकडे,शत्रुघ्न भोईर यांच्या सह सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रदिप जगताप यांनी केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement