• Total Visitor ( 701085 )
News photo

पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण संस्थांना पूर्ण सहकार्य राहील 

Raju Tapal publisher June 01, 2026 255

पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण संस्थांना पूर्ण सहकार्य राहील 

      

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे,उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची ग्वाही 



पुणे :- पुणे जिल्हा परिषद ही राज्यातील अग्रगण्य जिल्हा परिषद असून जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालकांना जिल्हा परिषदेचे शिक्षण खाते पूर्ण सहकार्य करील अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे व उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली. 

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर बैठकीला उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत संच मान्यता,बिंदू नामावली,अनुकंपा भरती,पदोन्नती,श्रेणी वाढ,आजारपणाची प्रलंबित बिले,स्वमान्यता,वेतनेतर अनुदान यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. पवित्र पोर्टल मार्फत राज्यात शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत शिक्षण विभाग व मागासवर्ग कक्ष यांनी उत्तम सहकार्य केल्याबद्दल बैठकीत समाधान व्यक्त केले. अशी माहिती संस्थाचालक शिक्षण मंडळ,पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. यापुढील पत्रव्यवहार करताना संस्थाचालकांशी ईमेल द्वारे करावा जेणेकरून संस्था व मुख्याध्यापक यांच्यात समन्वय राहील अशी सूचना उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केली. बैठकीला जिल्हा परिषद बांधकाम सभापती सौ.दिपाली हुलावळे,शिक्षण संस्थाचालक संघटनेचे उपाध्यक्ष अनिल तात्या मेहेर,खजिनदार महेश ढमढेरे,सहसचिव वीरसिंह रणसिंग,उच्च शिक्षण समन्वयक डॉ.प्रसन्नकुमार देशमुख,माध्यमिक शिक्षण समन्वयक शिवाजी खांडेकर, प्रदीप वळसे पाटील,अजित वडगावकर व शिवाजी चाळक उपस्थित होते. सचिव ॲड.संग्राम कोंडे- देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026