• Total Visitor ( 544693 )
News photo

साप पकडत असताना सर्पमित्राचा मृत्यू 

Raju Tapal publisher May 27, 2026 63

साप पकडत असताना सर्पमित्राचा मृत्यू 



शिरूर:- साप पकडत असताना साप चावल्याने सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची घटना हवेली तालुक्यातील कोलवडी ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी २५ मे‌ २०२६ रोजी घडली. सोमवारी सायंकाळी कोलवडी ग्रामपंचायत हद्दीत साप निघाल्याची माहिती सर्पमित्र दिपक संतोष जाधव वय -२१ रा‌.सिद्धेश्वर मंदीर रोड,काळेवस्ती थेऊर ता‌.हवेली याला मिळाल्यानंतर सापाला जीवदान देण्यासाठी तो तेथे पोहोचला.एका ठिकाणी पडलेल्या पत्र्याच्या ढिगाखाली साप असल्याचा संशय त्याला आल्यानंतर दिपक याने पत्र्याच्या खाली हात घातला.त्यानंतर  पत्र्याखाली दबा धरून बसलेल्या सापाने त्याच्या हाताला दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्याला उपचारासाठी पुणे येथील ससून रूग्णालयात नेले.उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रूग्णालयातील डाॅक्टरांनी उपचारासाठी नेणा-यांना सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement