अंघोळीसाठी गेलेल्या दोघा भावंडाचा मृत्यू
Raju Tapal
November 29, 2021
34
निळवंडे जलाशयावर अघोळीसाठी गेलेल्या दोघा भावंडाचा पाण्याच्या भोव-यात बुडून मृत्यू
निळवंडे जलाशयावर अघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोघा भावंडांचा पाण्याच्या भोव-यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
समीर शांताराम पवार वय -१४ , सोहम शांताराम पवार वय - ११ हे दोघे भावंडे मुंबई येथील नातेवाईक आकाश रमेश जाधव ,अर्जून विनोद गायकवाड यांना राजूर येथून फिरण्यासाठी रविवारी सायंकाळी ४ वाजता निळवंडे जलाशयावर गेले होते.
समीर व सोहम हे कपडे काढून जलाशयाच्या पुलाखाली अंघोळीसाठी पोहण्यासाठी पाण्यात उतरले. त्यावेळी प्रवाह वाढल्याने भोवरा होवून दोन्ही मुले पाण्याने ओढून घेतली.
आकाश जाधव व अर्जून गायकवाड यांनी समीर व सोहम यांना शोधण्याचा प्रयत्न केला. ते दोघे दिसले नाही. त्यांनी शोधाशोध केली असता त्यांना त्यांचे कपडे व चपला दिसल्या. स्थानिक आदिवासी ठाकर समाजाचे मच्छीमार सोमनाथ मेंगाळ यांनी सायंकाळी नदीपात्रात टायर घेवून शोधाशोध केली असता रात्री उशिरा समीरचा मृतदेह सापडला. सोमवारी सकाळी सोहमचा मृतदेह सापडला.
अकोले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी पंचनामा करून अकोले ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
Share This