• Total Visitor ( 133209 )

अनधिकृत बांधकामांना केडीएमसीचा पाठींबा

Raju tapal October 17, 2024 138

अनधिकृत बांधकामांना केडीएमसीचा पाठींबा..?

उपायुक्त अवधूत तावडे यांचे आदेश फाट्यावर
 
राजू टपाल.
कल्याण :- कल्याण डोंबिवली महापालीकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या अत्रे नाट्यगृहासमोरच चार गाळ्यांच्यावर अनधिकृत बांधकाम करून शेड टाकण्याचे काम करण्यात येत आहे. सदर अनधिकृत बांधकामाबाबत 'दैनिक जनमत' ने परखड व सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अखेर केडीएमसीचे उपायुक्त(अबानि) अवधूत तावडे यांनी गंभीर दखल घेत क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांना लेखी नोटीस काढून सदरील अनधिकृत बांधकामांवर निष्काशनाची कारवाई करण्याचे आदेश 7 ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशात दिलेले आहेत. मात्र दहा दिवस उलटूनही सदरील अनधिकृत बांधकामांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने सदरील अनधिकृत बांधकामांना पालिका छुपा पाठिंबा देत आहे का असा नाराजीचा सूर नागरिकांतून निघत आहे. जर महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेकडून कारवाई होत नसेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा विचार न करण्यासारखे आहे.
 
 दरम्यान केडीएमसी उपायुक्त अवधूत तावडे यांनी पदनिर्देशित सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांना सदरील बांधकाम धारकांना त्वरित नोटिसा देऊन बांधकाम निष्काशीत करून  बांधकाम धारकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या अनव्ये व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार  तात्काळ कार्यवाही प्रस्तावित करण्याचे आदेश सदरील नोटीसीत दिलेले आहे. मात्र उपायुक्त अवधूत तावडे यांनी सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांना दहा दिवसांपूर्वी नोटीस देऊन ही यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असल्याची चर्चा आहे.
याबाबत सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्याकडे विचारणा केली असता सदरील बांधकाम धारकांना सदरील बांधकाम स्वतः पाडण्याचे आदेश दिलेले असल्याचे सांगितले.
 

Share This

titwala-news

Advertisement