• Total Visitor ( 133453 )

महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा!

Raju tapal March 28, 2025 28

महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा!
 राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा, सन 2024 -25 अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत द्वितीय पारितोषिक जाहीर!

महाराष्ट्र शासनाच्या उत्तरदायी सुलभ, पारदर्शी आणि गतिमान प्रशासनाच्या अनुषंगाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा, सन 2024 -25 अंतर्गत राज्यस्तरावरील थेट प्रस्ताव आणि विभागीय समित्यांकडून प्राप्त प्रस्ताव यांच्यामधून राज्यस्तरीय निवड समितीने केलेल्या मूल्यमापनानुसार महापालिका स्तरावरून प्राप्त झालेल्या प्रस्तावातून शासनाच्या दिनांक 26/03/2025 च्या शासन निर्णयाद्वारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला द्वितीय पारितोषिक रुपये ६ लक्ष जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालये,विभाग,महानगरपालिका,शासकीय संस्था,कर्मचारी यांनी आपले प्रस्ताव सादर केले होते.

स्पर्धेतील सात कार्यक्षेत्रांपैकी (१. कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब, २. सेवांची गुणवत्ता/ दर्जा यामधील वाढ व उपक्रमांची परिणामकारता, ३. लोकाभिमुखता ,४." इ - गव्हर्नन्स",५. संसाधनांचा  पर्याप्त व प्रभावी वापर,६. तंटा/ तक्रार मुक्त कार्यालय, ७.नाविन्यपूर्ण व पथदर्शी स्वरूपाच्या संकल्पना /प्रयोग/ उपक्रम) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने यामधील इ- गव्हर्नन्स या कार्यक्षेत्रांतर्गत अर्ज दाखल केला होता

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या "परिवर्तन" या प्रकल्पामुळे ई गव्हर्नन्स विभागाच्या " मायनेट-२" दोन प्रणालीद्वारे मालमत्ता करविषयक सर्व सेवा सुविधा ऑनलाइन व २४*७ easily accessible  उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमध्ये ऑनलाईन सेवाबाबत पसंती व विश्वास निर्माण झाल्याने महानगरपालिकेच्या सन२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वसुलीत उल्लेखनीय वाढ झालेली आहे .मालमत्ता कर विषयक सर्व सेवा व सुविधा ऑनलाईन २४*७  सहज उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना महापालिकेबद्दलचा विश्वास निर्माण झाला आणि त्यामुळे महापालिकेच्या मागील वर्षाच्या तुलनेत सन २०२३-२४  मध्ये मालमत्ता करवसुलीत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली व त्यात ऑनलाइन मालमत्ता कराचा वाटा जास्त आहे.
या पारितोषिकामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement