• Total Visitor ( 133413 )

अपंग विकास महासंघाकडून जागतिक अपंग दिन साजरा

Raju Tapal December 03, 2021 43

अपंग विकास महासंघाकडून
जागतिक अपंग दिन साजरा


3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन शासनाने घोषित केला आहे, त्या निमित्ताने अपंग विकास महासंघ अध्यक्ष अशोक भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक अपंग दिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन कल्याण येथील कार्यालयात करण्यात आले होते.
दिव्यांग बंधू व भगिनींच्या उपस्थित मध्ये केक कापून व खाऊ वाटून अपंग दिन साजरा करण्यात आला तसेच अपंग विकास महासंघाकडून दिव्यांगाना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
तसेच जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे व निवडणूक कार्यालय कल्याण यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांचे नवीन मतदार नोंदणी फॉर्म भरण्यात आले. निवडणूक विभागाच्या अधिकारी वर्षा टाळकर, रवि खटावकर यांनी सहकार्य केले.
जागतिक अपंग दिन कार्यक्रमाला अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, माधुरी क्षीरसागर, रोहिणी घोलप, तेजक्षी बेहेरे, राजू दांडगे,समीर चौधरी, जिलाना शेख ,कैलास गायकवाड महेश पाटकर सागर चौधरी गोरख सफाळे,जगदीश चौधरी, सुरेंद्र वाघ,राजू मोमतकर आदि उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement