नायलॉन मांजाचा घाऊक व किरकोळ विक्री आणि साठा न करण्याचे आवाहन
नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व मानवांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. पतंग उडवणाऱ्या सणांमध्ये अशा धाग्यांचा घाऊक / किरकोळ विक्रेते / साठा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने २०२१ च्या सुमोटो जनहित याचिका क्रमांक ०१/२०२१ मध्ये नायलॉन मांजा संबंधित मुद्यांची दखल घेतली आहे. "नायलॉन मांजा" हा विशेषतः पतंग उडवणाऱ्या सणांमध्ये वापरात आणला जात असून नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व मानवांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा धाग्यांचा घाऊक / किरकोळ विक्रेते / साठा करणाऱ्यांना थांबवून या मांजाची साठा, विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत जिल्ह्यातील विविध विभागांना निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजा धाग्यांचा घाऊक / किरकोळ विक्रेते / साठा करणाऱ्यांना प्रतिबंध करुन या मांजाचा साठा, विक्री होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) हरिश्चंद्र पाटील यांनी केले आहे.