अर्धवट तुटलेल्या गतिरोधकाने अपघाताला आमंत्रण. हा गतिरोधक काढण्याची वाहन चालकांची मागणी
कल्याण माळशेज नगर महामार्गावर असलेल्या बळेगाव ऊमरोली येथील गतिरोधक अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असुन संबंधित गतिरोधक ओंलाडताना दुचाकी स्वार तसेच चारचाकी वाहनांना अत्यंत त्रासदायक होत असुन दुचाकी स्वार अनेक वेळा दुचाकीवरून पडल्याच्या घटना रोजच घडत आहेत संबंधित रस्त्याचा दर्जा राज्य मार्ग क्रमांक दोन असताना अपघात रोखण्यासाठी गावामधुन जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले होते पुढे या रस्त्याला महामार्गाचा दर्जा दिला गेल्याने गरज असेल अशा ठिकाणी अत्यंत नविन चांगल्या प्रकारचें एक टप्पा असलेले गतिरोधक बसविण्यात आले त्यामुळे वाहनचालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसुन प्रवास सुखकारक होत आहे मात्र बळेगाव ऊमरोली दरम्यान असलेला गतिरोधक जुन्याच प्रकारचा तीन टप्प्यांचा असुन मधला भाग खोदुन काढलेला आहे परीणामी महामार्गावर असलेला सध्याचा गतिरोधक हा गतिरोधक आहे की बांधकाम खात्याने गतिरोधकाचा नविन प्रकार विकसीत केला आहे की काय ? अशी शंका वाहन चालका मधुन करण्यात येत असल्याने संबंधित प्रवाशांना त्रासदायक असलेला गतिरोधक एक तर काढुन टाकण्यात यावा अन्यथा नविन प्रकारचा गतिरोधक बसविण्यात यावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.