• Total Visitor ( 84969 )

अविवाहित तरूणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू ; राहुरी तालुक्यातील घटना

Raju Tapal November 23, 2021 42

राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात २४ वर्षीय अविवाहीत तरूणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.२२ नोव्हेबरला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास  घडली.

भारत बाबासाहेब वरघुडे असे मृत तरूणाचे नाव आहे. 

सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भारत वरघुडे विहीरीत पडला असता त्यांच्या वडिलांनी पाहिले. व आरडाओरडा सुरू केला.

गावघे सरपंच सर्जेराव घाडगे व पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणांना ही माहिती दिली. सोशल मिडियावर मदतीसाठी आवाहन करण्यात आले. 

सुभाष वराळे, अनिल बर्डे व अन्य दोघांनी भारत यास विहीरीत शोधण्याचा प्रयत्न केला. 

राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आपत्कालीन टीम मदतीसाठी धाडली.

तीन तासांनी भारत गळाला लागला मात्र त्याच्या पोटात पाणी गेल्याने तो मृत झाला. राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून  राहुरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

  दुस-या घटनेत कौटुंबिक वादातून एका रिक्षाचालकाने राहात्या घरी आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील आंबेगाव पठार येथे रविवारी रात्री घडली.

तुषार कलशेट्टी वय -३१ रा.सर्वे नंबर १६ साई सिद्धी चौक, आंबेगाव पठार पुणे असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

तुषार कलशेट्टी हे मागील १० वर्षापासून रिक्षा चालवत होते. साईसिद्धी चौकाजवळ ते पत्नी व ९ महिन्यांचा मुलगा असे तिघेजण राहात होते. तुषार घरी एकटेच असताना घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. सोमवारी सकाळी झाडुवाली महिलेस खिडकीतून तुषारचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला.

भारती विद्यापीठ पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement