• Total Visitor ( 85035 )

अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेळ्या ,मेंढ्यांचा मृत्यू

Raju Tapal December 03, 2021 32

अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेळ्या ,मेंढ्यांचा मृत्यू 

     

संततधार पाऊस व कडाक्याच्या थंडीचा फटका मेंढपाळांना बसला असून अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे रानात उघड्यावर असलेल्या शेळ्या,मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील फाकटे,चांडोह, जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद, शिरोली बुद्रूक, निमगाव तर्फे म्हाळूंगे, येडगाव, ओझर ,हिवरे तर्फे नारायणगाव तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदूर , खंदरमाळ शिवारात घडली.

शिरूर तालुक्यातील फाकटे येथील संतोष इचके यांच्या शेतात अर्जून केदारी यांच्या १५० मेंढ्यांचा तळ लावण्यात आला होता. त्यातील १७ मेंढ्या गारठून मृत्यूमुखी पडल्या. दामू रामभाऊ वाळूंज यांच्या शेतात गोविंद बाळू शिंदे यांनी तळ लावला होता. त्यांच्या १४० मेंढ्यांपैकी ८ मेंढ्या गारठुन मृत्यूमुखी पडल्या. चांडोह येथे चिंधू तांबे यांच्या ८ मेंढ्या गारठून मृत्यू मुखी पडल्या. 

घटनेची माहिती मिळताच जांबूतचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दामोदर गाढवे कर्मचारी अशोक रेणके घटनास्थळी हजर झाले. नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी फाकटे गावच्या सरपंच रेखा बाळासाहेब दरेकर यांनी केली आहे.

जुन्नर तालुक्यातील २१ गावातील ४०० हून अधिक मेंढ्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे मृत झाल्या. 

हवेत मोठ्या प्रमाणावर गारठा निर्माण झाल्यामुळे मेंढ्या दगावल्याची घटना घडली. 

वडगाव आनंद येथे सर्वाधिक १०० मेंढ्या मृत झाल्या.

गोळेगाव -४८, शिरोली बुद्रूक - ५, निमगाव तर्फे  म्हाळूंगे - २, येडगाव - ७, ओझर - ८, खोडद - २५, हिवरे तर्फे नारायणगाव - १२, मांजरवाडी - २०, वडगाव कांदळी - १०, खामुंडी - ३४, बोतार्डे - ३०, राजुरी - ४१, ओतूर - ६५, निरगुडे - २७, बोरी - १४, सावरगाव - २१, शिरोली खुर्द - ९, आळे येथे २ गाई व १८ मेंढ्याचा मृत्यू झाला. 

महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी शिवारात २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवरी दि.२ डिसेंबरला घडली.

संगमनेर तालुक्यात पठार भागात बुधवारी अवकाळी पाऊस झाला. याचा फटका मेंढपाळांना बसला. 

नांदूर खंदरमाळ व खंदरमाळ येथील माळरानावर मुक्कामी असलेल्या सतू रेवजी सोडनर, संदीप शंकर जांबूळकर, संजू लहानू झिटे, सर्व रा. मांडवे बुद्रूक, संगमनेर, सिद्धू सावळेराम कोकरे रा.घिंचेवाडी, साकूर, पोपट गंगाराम कुदनर रा.शिंदोडी संगमनेर, मारूती हरी कुळाळ रा.जांबूत बुद्रूक यांच्या २० मेंढ्या व कोकरांचा अवकाळी पावसाच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला.

मृत मेंढ्या व कोकरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नांदूर खंदरमाळ गावचे तलाठी युवराजसिंग जारवाल, महसूल कर्मचारी गणेश सोनवणे, पशुवोद्यकीय अधिकारी भास्कर कुतळ यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

Share This

titwala-news

Advertisement