आयशर टेम्पो -स्विफ्ट कारच्या धडकेत तिघे मेडिकल रिप्रेंझिटेव्ह ठार ; नांदुरशिंगोटे येथील घटना
-----------------
आयशर टेम्पो -स्विफ्ट कारच्या धडकेत ओषध कंपनीतील तिघे रिप्रेंझिटिव्ह जागीच ठार झाल्याची नांदुरशिंगोटे येथील चिपाचा नाला परिसरात मंगळवारी दि १२ ऑक्टोबरला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
भूषण बाळकृष्ण बधान वय -३५ रा. पाथर्डी फाटा नाशिक, शरद गोविंदराव महाजन वय -३९ रा.म्हसरूळ नाशिक, राजेशकुमार हरिशंकर तिवारी वय -३६ रा. अंबरनाथ कल्याण अशी अपघातात ठार झालेल्या मेडिकल रिप्रेंझिटिव्हची नावे आहेत.
तिघेही पुण्याहून नाशिककडे एम एच १५ टी सी १७२१ या स्विफ्ट कारने जात होते. शरद महाजन कार चालवत होते. नांदूर शिंगोटे येथे चिपाचा नाला परिसरात कार व आयशर टेम्पो क्रमांक टी एस टी ८८८६ या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात महाजन यांच्यासह कारमध्ये बसलेले भूषण बधान राजेशकुमार तिवारी या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच नांदूरशिंगोटे पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वावी,सिन्रर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते अपघाताचा तपास करत आहेत.