दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा.हा सण आपण घराघरात साजरा करतो, पण आपण रोज कामावर जाण्यासाठी ज्या वाहनाने आपण वर्षभर प्रवास करतो,त्या वाहनाच्या मनोमन ॠणात रहाण्यासाठी दस-याला पूजा करतो. असाच एक कार्यक्रम बदलापुर येथे संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाकडून कार्यरत असणा-या बदलापूर-बेलापुर रुट क्र.४७या बसच्या पूजनाचा कार्यक्रम बसचे चालक-वाहक व रोज बसने प्रवास करणारे प्रवासी यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.याप्रसंगी बसचे चालक-वाहक यांचा श्री. अशोक सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दस-याच्या एकमेकांना शुभेच्छा देत बदलापुर-बेलापुर बस क्र.४७ही बस प्रवाशांना इच्छीस्थळी पोहचविण्यास मार्गस्थ झाली.प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार मानण्यात आले. अशा प्रकारे दसरा पुजन उत्साहात संपन्न झाले.