बदलापुर ते बेलापुर मार्गावर नवी मुंबई महानगरपालिकेची बस सेवा सुरु
बदलापुर शहराचे झपाट्याने नागरीकरण होऊन प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे.तसेच बदलापुर ते बेलापुर या मार्गावर आनंदनगर,अंबरनाथ,पालेगाव,खोणी,पलावा तळोजा एमआयडीसी अशा विविध ठीकाणी गृहसंकुले होत आहेत.भविष्यात नागरीकरण होऊन लोकसंख्येत वाढ होत आहे.याची गंभीर दखल बदलापुर ते बेलापुर या बस मार्गावरुन प्रवास करणा-या प्रवांनी घेतली.तसे सह्यांचे निवेदनही त्यांनी मा.परिवहन व्यवस्थापक,नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवा,सीबीडी,बेलापुर येथे सादर केले.त्याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.प्रवाशांनी सातत्याने नवी मुंबई परिवहन सेवा कार्यालयात संबंधित पदाधिकारी यांच्या गाठी भेटी घेतल्या. चर्चा केली. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन बदलापुर-बेलापुर ही नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची बस सेवा सुरु झाली.ब-याच वर्षापासून प्रवाशांची ही मागणी होती. ती पुर्ण झाली.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची ही बस सेवा सुरु करण्यासाठी अरुण अहिरे,पोलिस आयुक्त नवी मुंबई कार्यालय,घनश्याम भाऊ,सीमा मॅडम,वैदेही मॅडम,मनिषा मॅडम,मकरंद,प्रशांत जवेरी आदी प्रवाशांनी विशेष परिश्रम घेतले.