जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी दैनिक गांवकरीच्या दिनदर्शिकेचे केले प्रकाशन
जुन्नर :- जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या हस्ते दैनिक गांवकरी च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी दैनिक गांवकरीला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या समाजासाठीच्या कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये दत्ता शिंदे, जितेंद्र फुलसुंदर, नयन डुंबरे, उपसरपंच विशाल बनकर, भरत अस्वार, संकेत अस्वार आणि रवी गजे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात झाले असून, यावेळी सर्व उपस्थितांनी दैनिक गांवकरीच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांना प्रोत्साहन दिले.