बल्याणीत दोन वर्षीय बालकाला कुत्रा चावला
बल्याणी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसरातील बालके व नागरिक कुत्र्यांच्या भितीने घाबरून गेले आहेत. नुकत्याच भटक्या कुत्र्यांनी दोन बालकांना चावा घेतले असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
यातील नाईस चाळीतील जखमी बालक अरहान शाहरुख शेख वय वर्षे दोन याला एजीआर शाळेच्या परिसरात कुत्र्याने हल्ला करून संपूर्ण गालच भटक्या कुत्र्यांनी तोडल्याने येथील भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून येत आहे. सदरील बालकावर निरहा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.