बारामती नगरपालिकेतील नगरसेवक किरण गुजर अपघातातून बचावले
Raju Tapal
December 08, 2021
33
बारामती नगरपालिकेतील नगरसेवक किरण गुजर अपघातातून बचावले
बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या इनोव्हा गाडीला आज मंगळवार दि.७/१२/२०२१ रोजी दुपारी सासवड - जेजुरी रस्त्यावर अपघात झाला.
सूदैवाने या अपघातात नगरसेवक किरण गुजर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
शाळेतील विद्यार्थी रस्त्यावर आल्यानंतर समोरील गाडीने अचानक ब्रेक मारल्यामुळे त्यांच्या गाडीने समोरील गाडीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
त्यांच्या गाडीच्या एअरबॅग्ज खुल्या झाल्याने त्यांना दुखापत झाली नाही.
गाडीचा वेग मर्यादित होता.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किरण गुजर यांच्यावर काही जबाबदारी सोपवली होती. ते पुण्यावरून बारामतीकढे निघाले असताना सासवडपासून ८ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. या अपघातात इनोव्हा गाडीचे मोठे नुकसान झाले.
Share This