ढोकसांगवी येथील खंडोबा देवाला पारोडीत जलस्नान
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- सोमवती अमावस्येनिमित्त शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथील कुलदैवत खंडोबा देवाच्या मुर्तींंना पारोडी येथील भीमा नदीपात्रात जलस्नान घालण्यात आले.
खंडोबा देवाचे पुजारी शरद गुरव यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ढोकसांगवी येथे देवाची महापुजा,सामुहिक आरती झाल्यानंतर पालखीचे वाजतगाजत पारोडी गावाकडे प्रस्थान झाले.
अमावस्येला प्रारंभ झाल्यानंतर दुपारी १२.१५ ( सव्वा बारा) वाजता पालखीतील सहभागी भाविकांच्या हस्ते श्रींच्या मुर्तींना भीमा नदीपात्रात स्नान घालण्यात आले.यावेळी सदानंदाचा येळकोट... येळकोट , येळकोट जयमल्हार.... जयघोष करण्यात आला.
पालखी सोहळ्यात शाळकरी मुलांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.दुपारनंतर देवाची आरती झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी पालखी ढोकसांगवी गावाकडे मार्गस्थ झाली.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे)