भाजपाची कार्यपद्धती ही भारतीय राजकारणात सर्वात श्रेष्ठ
Raju Tapal
December 05, 2021
36
भाजपाची कार्यपद्धती ही भारतीय राजकारणात सर्वात श्रेष्ठ - माजी आमदार नरेंद्र पवार
■ उत्तर रायगड जिल्हा प्रशिक्षण शिबिरात नरेंद्र पवारांचे प्रतिपादन
उत्तर रायगड जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर माथेरान येथे उत्साहात संपन्न झाले. सदर शिबिरात प्रमुख वक्ता म्हणून माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी भाजपा पक्षाची संरचना व कार्यपद्धती या विषयावर उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
भाजपाचा कार्यकर्ता हा पक्षाची आयडेंटिटी असतो. आपली कार्यपद्धती ही अंत्योदय कल्याणाची आहे त्यामुळे भारतीय राजकारणात भाजपला वेगळे वजन आहे, भाजपाची जनता पार्टीची कार्यपद्धती ही भारतीय राजकारणात श्रेष्ठ असल्याचे मत दरम्यान बोलताना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. दरम्यान सुरुवातीला माथेरान येथे प्रभू श्रीराम मंदिरात दर्शन घेतले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व हुतात्मा भाई कोतवाल यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
संघटन बांधणी आणि अंत्योदय घटकांच्या कल्याणासाठी सामान्य कार्यकर्ता सतत कार्यरत असतो. सेवा हेच संघटन याला प्रमाण मानून काम करत राहिले पाहिजे, भाजपा ही घराणेशाही नाही तर लोकशाहीने पुढे जात आहे, इथे सामान्य कार्यकर्ताही राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो असेही नरेंद्र पवार पुढे बोलताना म्हणाले.
यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ते माधवजी भंडारी,आमदार निरंजनजी डावखरे,उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, विनोद साबळे, दिपक बेहरे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनिल घरत,कर्जत मंडळ अध्यक्ष मंगेश म्हसकर, माथेरान नगरपरिषद उपनगर अध्यक्ष आकाश चौधरी, कर्जत नगरपरिषद उप नगरअध्यक्ष अशोक ओसवाल,कर्जत सरचिटणीस राजेश भगत आदी. रायगड ग्रामीण जिल्हातील विविध नगरपरिषदेतेली नगरसेवक, विषय समितीचे सभापती, जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Share This