भरधाव चारचाकीने बसथांब्याला धडक दिल्याने दोन तरूण ठार
Raju Tapal
December 09, 2021
32
भरधाव चारचाकीने बसथांब्याला धडक दिल्याने दोन तरूण ठार ; खराडी बाह्यवळण चौकाजवळ अपघात
नगररस्ता बी आर टी मार्गावर खराडी बाह्यवळण चौकाजवळ रात्री झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला.
या अपघातात दोन तरूण गंभीर जखमी झाले .
भरधाव चारचाकीने बसथांब्याला धडक दिल्याने हा अपघात झाला.
बी आर टी मार्गातून जाताना चार चाकी खराडी बाह्यवळण चौकाजवळ बी आर टी बसथांब्यास धडकली.
चौघेही तरूण दारू पिलेले होते. चारचाकीचा वेग सुमारे १४० च्या आसपास होता. अशी माहिती विमानतळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव यांनी पत्रकारांना दिली.
दोन तरूण चंदननगर येथील , दोन तरूण वाघोलीचे असून या अपघातातील मयत संकेत भुजबळ हा तरूण भाजपाचा पदाधिकारी होता असे समजते.
दोन जखमी तरूणांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचेही समजते.
Share This