• Total Visitor ( 84638 )

भरधाव क्रुझर गाडीला दुचाकीची धडक ,अपघातात भाऊ बहीण ठार

Raju Tapal November 07, 2021 38

भरधाव क्रुझर गाडीला दुचाकीची धडक ,अपघातात भाऊ बहीण ठार ; जत तालुक्यातील दरीकोन्नूर येथील घटना

 

भरधाव क्रुझर गाडीला दुचाकीने  धडक दिल्याने झालेल्या अपघातात भाऊ बहीण ठार झाल्याची घटना भाऊबीजेच्या दिवशी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरीकोन्नूर या ठिकाणी घडली.

अक्षय श्रीमंत चौगुले वय -२०, काजल श्रीमंत चौगुले वय -१६ अशी अपघातात ठार झालेल्या भाऊ बहिणीची नावे आहेत.

भाऊबीजेच्या निमित्ताने मोठ्या बहिणीच्या घरी हे दोघेही बहिण भाऊ दुचाकीवरून पंढरपूर येथील व्हेळ या बहिणीच्या घरी गेले होते. 

त्यानंतर भाऊबीज आटोपून दोघेही दरीबडची आपल्या गावी परतत होते. अवघ्या एक किलोमीटरवर गाव असताना दरीकोन्नूर या ठिकाणी समोरून येणा-या भरधाव क्रुझर गाडीला त्यांची धडक बसली.

३० फुट गाडीसह दोघेही फरफटत गेल्याने दोघा बहिण भावाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This

titwala-news

Advertisement