भरधाव वाहनाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू ; पुणे - सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ एम आय डी सी चौकातील घटना
भरधाव वाहनाने चिरडल्याने तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे - सोलापूर महामार्गावरील कुरकूंभ एम आय डी सी चौकात घडली.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची तसेच जखमींची नावे समजू शकली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात भरधाव वाहनाने पाच जणांना चिरडून जवळपास ५० फुटांवर फेकले. तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला.
एक रूग्णवाहिका जखमींना घेवून गेल्यावर मृत्यूमुखी पडलेल्या तिघांचे मृतदेह तासमर रस्त्यावरच पडून होते.
महामार्गाच्या रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने औद्योगिक क्षेत्रातील सिप्ला व अल्कली अमाईन्स या कंपनीच्या रूग्णवाहिकेतून शव दौंड येथे हलविण्यात आले. रस्ता ओलांडताना हा अपघात झाला असून अपघातातील मृत्यूमुखी पडलेले तसेच जखमी एका कामगाराच्या कुटूंबातील असल्याचे समजते.