भरधाव वेगातील बोलेरोने दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील २० वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना दौंड तालुक्यातील खोर येथील खोपाडा - राजुरीपाटी नजीक रविवारी ७ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
संभाजी अंबर शिंदे वय २० वर्षे रा. देऊळगाव गाडा असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
संभाजी माणिकराव माने वय -२२ रा.खोर ता.दौंड ,दुचाकीचालक सतिश गुलाब ठोंबरे वय - २६ रा.रिसे पिसे हे दोघेजण अपघातात गंभीर जखमी झाले.
बोलेरो गाडी खोर गावाच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी दुचाकीवरून तिघेजण भांडगावच्या दिशेने चालले होते. राजुरी पाटीच्या पुढे खोपड्यानजिक आल्यावर भरधाव वेगाने येत असलेल्या बोलेरो गाडीने दुचाकीला बोलेरो गाडीच्या मधोमध उडवून दिले.
अपघातात दुचाकीस्वार संभाजी अंबर शिंदे हा युवक जागीच ठार झाला.
संभाजी माने, सतिश ठोंबरे हे उडून रस्त्याच्या कडेला पडले.
बोलेरोचालक राजेंद्र डोंबे अपघातानंतर अपघातस्थळी गाडी न थांबविता पळून गेला. बोलेरोचालकाविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश कर्चे, रमेश कदम अपघाताचा तपास करीत आहेत