भारतीय प्रजासत्ताक दिन टोकावडे जि.प.शाळेत उत्साहात साजरा,शाळेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे देखील वाटप !
टोकावडे जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.१ ते ८ वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी भाषण व गायनाचे कार्यक्रम केले.तसेच गावातील मंडळी देखील उपस्थित होते.गुंज सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तर वाटप करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे, शालेय वैधस्थापक समिती अध्यक्ष दत्ता विशे, समाजसेवक राजेश भांगे,कुणबी समास संघटना प्रकाश पवार,भागवत पवार गणेश राऊत ,व महिला सारिका घोलप माधुरी निमसे व्दारका निचित गुरुजण,महिला कार्यकर्त्यां उपस्थित होते.दरम्यान गुंज सामाजिक संस्था व युवा सामाजिक कार्यकर्ते महेश भांगे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळा तळवली, उंबरपाडा, बोराडेपाडा, करचोंडे, हेदवली, या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले