"भारतीय संविधानाने बहुजनांसह बारा बलुतेदारांसह असंख्य भारतीयांना फायदा - रविंद्रदादा जाधव"
नाशिक दि.२६/ भारतीय संविधानामुळे बहुजनांसह बाराबलुतेदार व असंख्य भारतीयांना फायदा होत असतांना तरीही संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जि संकल्पना मांडली होती ती आजपण पुर्णपणे होताना दिसत नाही कारण या देशातील सत्तर टक्के लोकांना संविधानाचे फायदे मिळत नाही त्याच मुळे संविधानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे मत अन्याय अत्याचार निर्मुलन समीतीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांनी व्यक्त करुन संविधान दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेबआंबेडकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.अ.आ.नि.स.च्या वतिने प्रदेश सल्लागार एँड. शिरीष पाटील यांचे अध्यक्षतेखाली नाशिकरोड कोर्ट चेंबरमध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अ.आ.नि.स.चे दिंडोरी तालुकाध्यक्ष पत्रकार अमोल भालेराव, अँड. अश्विनी कुळकर्णी, अँड.समक्षा महोरे, अँड. सोनिया जाधव, अँड.अंकिता टीळे, अँड.रुतुजा कारवाल, अँड.चंद्रकांत उबाळे, आदींनी संविधाना निमित्त शुभेच्छा देवुन संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय नागरिकांना शुभेच्छां दील्या. या कार्यक्रमास वरील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. रुतुजा कारवाल यांनी केले तर आभार अँड. समीक्षा मोहोरे यांनी मानले.