भव्य किल्ले व रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन
अविनाश पवार संस्थापक/अध्यक्ष राजेंद्र पालांडे सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य किल्ले व रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन रविवार २८ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते.सदर स्पर्धेत २० किल्ले तसेच १५० हुन अधिक रांगोळी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.त्यातील २० पारितोषिक हे किल्ले विभागाला तसेच २० पारितोषिक हे रांगोळी विभागाला असे एकूण ४० पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र स्वरूपात देण्यात आले.तसेच सौ.सुहासिनी चव्हाण यांची कल्याण विभाग संघटिका पदी नवीन नियुक्ती करण्यात आली.
सदर पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख उपस्थिती लाभलेले मान्यवर भारतीय मराठा संघाचे संस्थापक/अध्यक्ष मा.श्री.अविनाशजी पवार साहेब,प्रदेश सरचिटणीस मा.श्री. राजेंद्र पालांडे, खजिनदार अजित जाधव,नगरसेवक महेशशेठ गायकवाड,तलाठी संघटना कार्याध्यक्ष सुभाषजी ढोणे,प्रदेश उपाध्यक्ष दिपक पालांडे,प्रदेश सचिव महेश महापदी,प्रदेश उपाध्यक्ष आनंदा संकपाळ,प्रदेश उपाध्यक्षा सौ.संपदा ताई ब्रीद,शिवसेना उपशहर संघटक सौ.रीनाताई ढोणे,शिवसह्याद्री प्रतिष्ठान जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती मुळीक,युवासेना उपजिल्हा अधिकारी भुषण यशवंतराव, युवासेना उपशहर अधिकारी शेखर पिसाळ, राहुल खंदारे सर यांची उपस्थिती लाभली होती.
तसेच सदर कार्यक्रमाचे नियोजन भारतीय मराठा संघ कल्याण जिल्ह्याच्या वतीने ठाणे/पालघर जिल्हा संपर्कप्रमुख विनोद जाधव,ठाणे युवा जिल्हा अध्यक्ष सागर सुनिल वाळवे, कल्याण जिल्हाध्यक्ष सागर पाटील,युवा जिल्हाध्यक्ष मयुर डोंगरे,गणेश मोरे,सीताराम कोकणे,सुदेश ब्रीद,प्रणाली ब्रीद,प्रियांका मोरे,अर्पिता जाधव,पूनम बेले,करण्यात आले होते,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर वाळवे यांनी केले.