• Total Visitor ( 84538 )

भुसा वाहतूक करणा-या आयशर टेम्पोची दुचाकीला धडक

Raju Tapal December 20, 2021 34

भुसा वाहतूक करणा-या आयशर टेम्पोची दुचाकीला धडक ; एका युवकाचा मृत्यू 

 

भिगवण - राशीन रोडवर भुसा वाहतूक करणा-या आयशर टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन येथील एका युवकाचा मृत्यू झाला.

या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला.

चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोनै दुचाकीला जोरदार धडक देवून टेम्पो समोरील इलेक्ट्रिक खांबावर आदळून पलटी झाला.

अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते.

जखमींना उपचारासाठी बारामती येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी वसीम दाऊद शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टेम्पोची इलेक्ट्रिक खांबाला धडक बसल्यामुळे इलेक्ट्रिक खांब तुटून त्याठिकाणी विजेचा धक्का बसण्याचा धोका निर्माण झाला होता.

महावितरण कर्मचा-यांनी तात्काळ वीजपुरवठा खंडीत केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.

दुस-या अपघातातील घटनेत नर्सी - सेनगाव रोडवर बाहेती पेट्रोलपंपासमोर जीपच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील १८ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

एकनाथ हरिभाऊ जुमडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथील एकनाथ हरिभाऊ जुमडे हा हिंगोली येथील महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत होता. एकनाथ नेहमीप्रमाणे एम एच ३८ वाय ०६३० या क्रमांकाच्या दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघाला होता.

बाहेती पेट्रोलपंपासमोर हिंगोली येथून सेनगावकडे जात असलेल्या एम एच ३८ -७१९७ या क्रमांकाच्या भरधाव जीपने एकनाथच्या जीपला जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच प़ोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे, गणेश कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

खाजगी वाहनाद्वारे उपचारासाठी नेत असताना जखमी एकनाथचा वाटेतच मृत्यू झाला.

Share This

titwala-news

Advertisement