दौंड तालुक्यातील दहिटणे शिंदेमळा येथील मेंढपाळाच्या पालावर भरदिवसा बिबट्याने हल्ला करून २६ मेंढ्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली.
मेंढपाळ संपत सोमनाथ थोरात व नवनाथ यशवंत बोरकर हे दिगंबर मगर यांच्या शेतात मुक्कामी होते. मेंढपाळ बक-यांना चारा चारण्यासाठी घेवून गेले असता शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने बोरकर यांची ११, थोरात यांची १५ बक-यांवर हल्ला चढवला. या घटनेत सुमारे अडीच ते तीन लाख रूपयांचे नुकसान झाले.
वनपाल गणेश पवार, वनरक्षक शिवकुमार बोंबले ,विलास होले यांनी या घटनेचा पंचनामा केला.