• Total Visitor ( 84979 )

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू ; येणके ता.कराड येथील घटना

Raju Tapal November 17, 2021 34

                            ऊसतोड सुरू असताना ५ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करण्याची घटना येणके ता.कराड येथे सोमवार दि.१५ नोव्हेंंबरला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

५ वर्षीय मुलाला बिबट्याने ऊसाच्या शिवारात सुमारे अर्धा किलोमीटर फरफटत नेले. 

ऊसतोड मजुरांनी पाठलाग केल्यानंतर मुलाला  तिथेच सोडून बिबट्याने धूम ठोकली.मात्र बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. 

आकाश बिगाशा पावरा असे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. कराड तालुक्यातील येणके, किरपे परिसरात ऊसतोड सुरू आहे. त्यासाठी कारखान्यांच्या ऊस मजूर टोळ्या शिवारात राहाण्यास आलेल्या आहेत.

सोमवारी सकाळी येणकेतून किरपेकडे जाणा-या रस्त्यालगतच्या शिवारात मजुरांची एक टोळी ऊसतोड करत होती. 

या टोळीतील एका कुटूंबातील पाच वर्षांचा आकाश पावरा हा मुलगा मजुरांपासून काही अंतरावर शेतात खेळत होता. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घातली.

मुलाला फरफटत नेत असताना हा प्रकार मजुरांच्या निदर्शनास आला.

त्यांनी पाठलाग सुरू केला. त्यावेळी अर्धा किलोमीटर अंतरावर ऊसाच्या फडात सोडून बिबट्याने धूम ठोकली. 

बिबट्याचा हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला.

Share This

titwala-news

Advertisement