अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कुरकूंभ - दौंड रस्त्यावरील मोरे वस्ती येथे घडली.
सुरज पासलकर वय -२५ रा.लिंगाळी ता.दौंड असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या अपघाता बाबत समजलेल्या माहितीनूसार, कुरकूंभ - दौंड रस्त्यावर मोरे वस्ती येथील कॅनालजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहन व सुरज पासलकर याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.सुरज पासलकर या दुचाकीस्वाराला जबर मार लागून तो अपघातात मृत्युमुखी पडला.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )