कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; शिक्रापूर येथील घटना
कासारी फाट्यावर दारूची वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची दुसरी घटना
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे - अहिल्यानगर महामार्गावर शिक्रापूर येथे बुधवारी घडली तर दारूची वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची दुसरी घटना कासारी फाट्यावर घडली.
शरद रामचंद्र वाघ वय - ५५ रा.करंजेनगर, शिक्रापूर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून आयुष शरद वाघ वय - २३ वर्षे याने या अपघाताची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये दिली.
शरद वाघ हे एम एच १२ एल एच २६८५ या क्रमांकाच्या दुचाकीवरून अहिल्या नगरच्या दिशेने चालले होते. पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारची शरद वाघ यांच्या दुचाकीला धडक बसल्याने शरद वाघ रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान दुस-या घटनेत,नाशिक येथून बीकेएस कंपनीच्या दारूच्या बाटल्या घेऊन सासवडच्या दिशेने चाललेला टेम्पो क्रमांक एम एच १७ बी वाय १९८१ समोरून भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने कट मारल्याने कोंढापुरी पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कासारी फाट्यावर तळेगाव ढमढेरे रस्त्यावर उलटल्याने या अपघातात टेम्पो चालक गणेश भाबड किरकोळ जखमी झाला. टेम्पो सह दारूच्या बाटल्यांचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर)