बोगस डॉक्टर मुळे आदिवासी महीलेचा मृत्यु
प्राथमिक आरोग्य केंद्रावरील रिडायर्ड शिपाई ठरला पाच जणांच्या मृत्यूस कारण , रिटायर्ड नंतर घरी थाटला दवाखाना , या डाॅक्टरवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुरबाड : बदलत्या हवामानात थंडी ताप अंगदुखी सारखे आजार बळावल्याने गोरगरीब सस्त्यात उपचार करुन घेण्यासाठी तज्ञ नसलेल्या बोगस डाॅक्टरकडे जाऊन आपला जिव धोक्यात घालत असून अशाच एका वैद्यकिय सेवेतून शिपाई म्हणून रिटायर्ड झालेल्या पांडुरंग घोलप या डाॅक्टर बनलेल्या बोगस डाॅक्टरने पाच निष्पाप गोरगरीबांचे जिव घेतल्याने खळबळ माजली असून या डाटक्टवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.
धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले अनेक वर्षे शिपाई असलेले पांडुरंग दगडू घोलप हे बिनभोभाट सेवेत असतांना दवखान्यात डाॅक्टर म्हणून घेत गोरगरीबावर उपचार करीत असत .सेवेतून निवृत्त झाल्या नंतर त्यांनी आपल्या घरात दवाखाना थाटून सस्त्यात उपचार सुरु केले . सरकारी दवाखान्यापेक्षा या बोगस डाॅक्टरवर विश्वास ठेऊन त्याच्याकडून उपचार करुन घेत असत . दिनांक 24 व 26 जानेवारी 2020 रोजी धसई परीसरातील या आदिवासी महिलांच्या वर चुकीचे उपचार केल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला असतांनाचं राम भिवा आसवले रा.मिल्हे , आलका रविंद्र मुकणे रा.मिल्हे , यांच्यावर पांडुरंग घोलप या बोगस डाॅक्टर कडून त्यांच्यावर चुकिचे उपचाराने झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असून या बोगस डाॅक्टरवर टोकावडे पोलिस ठाण्यात कलम 304 ,420 अन्वये गुन्हा दाखल आल्याची माहिती पोलिस हवालदार नितीन घाग यांनी दिली. बोगस डाॅक्टर फरार झाला आहे .
या डाॅक्टरवर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी केली आहे .