बोलठाण येथे राबिया चारीटेबल ट्रस्टच्यावतीने मोफत जलकुंभ
पाण्याचा प्रश्न सुटला
तालुक्यातील घाटमाथ्यावरील पूर्व भागातील बोलठाण येथील मुस्लिम मोहल्ला मध्ये राबिया चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने जनतेची पाण्याची अडचण टंचाई दूर व्हावी म्हणून बोरवेल घेऊन जलकुंभांची छोटीशी टाकी बांधून नळाद्वारे पाणी मिळावे म्हणून मोफत जलकुंभ बांधण्यात आली या टाकीचे (जलकुंभाचे ) उद्घाटन राबिया चारीटेबल ट्रस्टचे जाबीर मौलाना यांच्या हस्ते करण्यात आले.
आज रविवारी सकाळी 11 वाजता बोलठाण येथील बाजार तळा जवळील मुस्लिम मोहल्ला एक बोरवेल घेऊन जलकुंभची टाकीचे बांधकाम करून नळाद्वारे पाण्यासाठी नळाच्या तोट्या बसवून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मोफत वरील सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे बोलठाण येथील ग्रामस्थ सुखी समाधानी आनंदात दिसत आहेत. तसेच ग्रामस्थांनी राबिया चारीटेबल ट्रस्ट चे आभार मानले.
यावेळी राबिया चारिटेबल
ट्रस्ट चे जाबीर मौलाना, इद्रीस मौलाना, फयीम मौलाना, तोसिफ मौलाना, तन्वर सय्यद, सईद सय्यद, व मुस्लीम बांधव उपस्थित होते.