नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्या कालखंडात 15 वित्त वित्त आयोगाच्या निधीतून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला असून बोलठाण येथील शिवनगर मधील महादेव मंदिराच्या प्रांगणात ब्लॉक बसविण्याचे उद्घाटन येथील सरपंच वाल्मीक गायकवाड,रफिक पठाण, ग्रामसेवक भगवान जाधव, यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.
बोलठाण येथील ग्रामपंचायतीमार्फत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून विकास कामांना सुरुवात झाली असून आज दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी शुक्रवारपासून संविधान गौरव दिनानिमित्ताने सुरुवात झाली. अनुषंगाने बोलठाण येथील शिवनगर मधील महादेव मंदिराच्या समोरील आवारात ब्लॉग बसविण्यासाठी उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच वाल्मीक गायकवाड व इतर मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.
तसेच संविधान गौरव दिनाच्या अनुषंगाने आज 26 नोव्हेंबर 2021 रोजी घंटागाडीचे येशील लोकार्पण सोहळा करण्यात आला. व इतर कामे ही सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच वाल्मीक गायकवाड व ग्रामसेवक भगवान जाधव यांनी बोलताना दिली.
संविधान गौरव दिनाच्या अनुषंगाने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी उद्घाटन प्रसंगी बुलढाणा येथील सरपंच वाल्मीक गायकवाड, उपसरपंच अंजुम अंजुम रफिक पठाण, ग्रामसेवक भगवान जाधव, सुभाष नहार, विष्णू बारवकर, अनिल कायस्थ, ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, रफिक पठाण, अनिल तात्या रिंढे, कांताबाई काळे, गणेश व्यवहारे, व ठेकेदार नयन मजूर संस्था नांदगाव व गावातील नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.